शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

९ वर्षांपूर्वी पळविलेली राज्य व्हॉलीबॉल स्पर्धा पुन्हा लातूरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 18:11 IST

यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज चषक लातुरात होणार असल्याने व्हॉलीबॉल क्षेत्रातून आनंद

- महेश पाळणे लातूर : २०१३ साली घोषित झालेली छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा डॉज देत ऐनवेळी मुंबईत हलविण्यात आली होती. याची खंत अनेक दिवस लातूरच्या व्हॉलीबॉलप्रेमीत होती. मात्र, आता ९ वर्षांनंतर पुन्हा या स्पर्धा लातूरला घेण्याचे राज्याच्या क्रीडा विभागाने घोषित केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात ही स्पर्धा लातूरच्या मैदानावर होणार हे मात्र, नक्की झाले आहे. परिणामी, व्हॉलीबॉल क्षेत्रातून आनंद व्यक्त होत आहे.

क्रीडा मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २००९ रोजी कुस्ती, कब्बडी, खो-खो प्रमाणे व्हॉलीबॉलसाठी शासनस्तरावर स्वतंत्र्य राज्यस्तर स्पर्धा घेण्याचे ठरविले होते. पहिली स्पर्धा १५ ते २१ मे २०११ दरम्यान पुण्यातील बालेवाडी येथे पार पडली. यावेळी १९ लाखांचे या स्पर्धेला अनुदान होते. आता यात वाढ करुन ५० लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा लातूरात होणार असल्याने लातूरच्या व्हॉलीबॉलला बळ मिळणार आहे.

निधी येऊन गेला परत...२०१३ मध्ये लातूरला स्पर्धा जाहीर झाली होती. यासाठी निधीही आला होता. मात्र, ऐनवेळी ही स्पर्धा मुंबईला हलविली. त्यामुळे आलेला निधी परत गेला होता. आता या स्पर्धेसाठी ५० लाखांचा निधी असून, विजेत्या संघास १.२५ लाख व उपविजेत्या संघास ७५ हजार रोख बक्षीसासह चषक देण्यात येणार आहे.

दोन वयोगटात स्पर्धा...व्हॉलीबॉल संघटनेच्या ज्युनिअर (१८ वर्षांखालील), युथ (२१ वर्षांखालील) अशा दोन गटात स्पर्धा होणार असून, राज्यातील ८ विभागातील ३२ संघांचा यात समावेश राहणार असून, ३८४ खेळाडूंसह प्रशिक्षक, पंच, व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

चार खेळांच्या स्पर्धा...राज्याच्या क्रीडा आयुक्तांनी शासनस्तरावरील २०२२-२३ या स्पर्धांचे ठिकाण निश्चित केले असून, छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल स्पर्धा लातूरात, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर कब्बडी स्पर्धा जळगाव, खाशाबा जाधव चषक राज्यस्तर कुस्ती स्पर्धा धुळे व भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खाे स्पर्धा नागपुर येथे होणार आहे.

क्रीडा विभागाकडून तयारी...लातूरच्या क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा कार्यालयाने या स्पर्धेसाठी कंबर कसली असून, जिल्ह्यातील आजी-माजी खेळाडूंसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुरुवातीला याबाबत बैठक होणार आहे. पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम नियोजनासाठी बैठक पार पडणार आहे.

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार