शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक उलटला; दोघेजण जागीच ठार

By हरी मोकाशे | Updated: December 30, 2022 15:54 IST

हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक हा पसार झाला आहे.

बेलकुंड (जि. लातूर) : भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री औसा- तुळजापूर महामार्गावरील शिंदाळा (लो.) नजीक घडली. याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादा पोलिसांनी सांगितले, रायपूर (छत्तीसगड) येथून लोखंडी अँगल घेऊन कोल्हापूरकडे ट्रक (एचएच २६, बीई ९२११) हा गुरुवारी रात्री निघाला होता. भरधाव वेगात हा ट्रक होता. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने गुरुवारी रात्री १० ते १०.३० वा. च्या सुमारास शिंदाळा (लो.) नजीक असलेल्या पुलावर आदळला.

या अपघातात ट्रकमधील मनजोतसिंग बुटर (३२) व लवप्रितसिंग रंधावा (२५, दोघेही रा. अमृतसर) हे जागीच ठार झाले. हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक दिलबागसिंग होंदल हा पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच भादा पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास नवले यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोउपनि. प्रकाश शिंदे, सपोउपनि. महादेव गिरी, फिरोज शेख हे करीत आहेत.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यू