शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी तरुणाच्या मृतदेहावर पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार! लातुरातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: October 28, 2022 19:20 IST

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अखेर एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या पाेलिसांनी मृतदेहावर २६ ऑक्टाेबर राेजी अंत्यसंस्कार केले.

लातूर : एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे. हा मृतदेह २५ ऑक्टोबर रोजी लातुरातील गंजगाेलाई व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्यावर आढळून आला. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली असून, पाेलिसांनी तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप ओळख पटली नाही. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अखेर एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या पाेलिसांनी मृतदेहावर २६ ऑक्टाेबर राेजी अंत्यसंस्कार केले.

पाेलिसांनी सांगितले, पाेलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील गंजगाेलाई येथील संकुलाच्या वरच्या मजल्यावरील टेरेसवर जाणाऱ्या पायऱ्यावर एका ३५ वर्षीय अनाेळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत २५ ऑक्टाेबर राेजी आढळून आला. मृतदेह कुजल्याने दुर्गंधी सुटलेली हाेती. दरम्यान, मयत तरुणाच्या अंगात पांढऱ्या रंगाचा लाईनिंगचा शर्ट असून, ताे उजव्या मनगटापर्यंत माेकळा आहे. तसेच त्याच्या अंगात हाफ पांढऱ्या रंगाची बनियन असून, अंगात निळ्या रंगाची जुनी वापरती जीन्स पॅन्ट आहे. चाॅकलेटी रंगाची अंडरवियर आहे. कमलेला लाल रंगाचा करदाेरा असून, पायात ग्रे आणि काळ्या रंगाचे साॅक्स आहेत.

मयताच्या डाेक्याला काळे केस असून, चेहरा गाेल आहे. नाक आखूड, बसके आहे. मयताने दाढी, मिशा ठेवलेले आहेत. मयत तरुणाच्या जवळ दाुरच्या ९० एमएलच्या बाटल्या, एक स्टीलचा जेवणाचा डबा, कमरेचा बेल्ट अशा वस्तू आढळून आल्या आहेत. याबाबत पाेलीस नाईक गाेपाळ देवकते यांनी दिलेल्या माहितीनुसार गांधी चाैक पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस