शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भूगर्भातून आवाजाचा होणार उलगडा; हासाेरी गावात नवी दिल्ली, नागपूरचे पथक भेट देणार !

By राजकुमार जोंधळे | Updated: September 13, 2022 19:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांची भेट, नागरिकांनी भूगर्भातून आवाजाने घाबरु नये

लातूर : निलंगा तालुक्यातील हासाेरीसह गावात गत आठ दिवसांपासून भूगर्भातून आवाज येण्याचा प्रकार घडत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांत घबराहटीचे वातावरण आहे. या आवाजाच्या अभ्यासाठी नागपूर येथील भारतीय भू-विज्ञान संस्था आणि नवी दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याचे भूकंप शास्त्र विभागाचे पथक हासाेरी गावात दाखल हाेणार आहे. नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी मंगळवारी गावाकऱ्यांशी संवाद साधताना केले.

हासोरी गावात गत सहा तारखेपासून भूकंपसदृश्य आवाज आणि धक्के जाणवत असल्याची नागरिकांनी महिती दिली. याबाबत ९ सप्टेंबररोजी प्रभारी अधिकारी भूकंप वेधशाळा हवामानशास्त्र विभाग, लातूर आणि वरिष्ठ व वैज्ञानिक पूजन सर्वेक्षण विभाग लातूर यांनी हासाेरी गावाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, भारतीय हवामान खात्याचे भूकंप वेधशाळा लातूर येथे भूकंपाची नोंद झाली नाही. याबाबत अतिरिक्त अभ्यास होण्याची गरज असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यासाठी नागपूर येथील भारतीय भु-विज्ञान संस्था आणि नवी दिल्ली येथील भारतीय हवामान खात्याचे भूकंपशास्त्र विभागाचे पथकाशी जिल्हाधिकारी यांनी पत्रव्यवहार केला आहे. दिल्ली आणि नागपूर येथील तज्ज्ञांचे पथक हासोरी गावाला भेट देणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव, तहसीलदार सुरेश घोडवे, वरिष्ठ वैज्ञानिक एस.बी. गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी, सहाय्यक भूवैज्ञानिक जि. प. लातूरचे प्रदीप नागरगोजे आदी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन आराखडा...गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्यानुसार विविध पथके स्थापन करणे, प्रशिक्षण देणे, शिवाय सुरक्षित स्थानांची निश्चिती करणे, धोकादायक इमारती, धोकादायक स्थळाची पाहणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या. १४ सप्टेंबररोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील भूगर्भशास्त्र विभागातील तज्ज्ञ, निलंगा येथील प्राध्यापकांचे पथक हासोरीत भेट देणार असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूर