शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

हॉटेल व्यावसायिकाने शाळेतून मुलीस घरी आणत घेतला टोकाचा निर्णय; दोघांचेही आढळले मृतदेह

By राजकुमार जोंधळे | Updated: March 20, 2024 17:34 IST

धक्कादायक! चिमुकल्या मुलीसह पित्याने घरातच संपवले जीवन

लातूर : सहा वर्षीय मुलीसह पित्याने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूर शहरातील मोती नगर भागात बुधवारी सकाळी ११:३० वाजण्यापूर्वी घडली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील मोती नगर भागात वास्तव्याला असलेल्या अभय लक्ष्मीनिवास भुतडा (वय ३५) यांचा हॉटेल व्यावसाय आहे. त्यांची सहा वर्षाची चिमुकली नवव्या ही सकाळी शाळेत गेली होती. वडील अभय याने आपल्या मुलीला शाळेतून घरी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास आणले. दरम्यान, त्यांनी राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. जवळच्या नातेवाईकांनी अभय भुतडा यांना फोन केला असता, त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. नातेवाईकांनी तातडीने मोती नगरातील घरी भेट दिली असता, सहा वर्षीय नवव्या आणि अभय भुतडा यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती गांधी चौक ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नातेवाईकाच्या माहितीवरून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

पोलिस पथकाकडून घटनेच्या कारणांचा शोध...घरात कोणीच नसल्याचे पाहून, मुलीला शाळेतुन बोलावून घेत अभय भुतडा यांनी मुलीसह आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेचा वेगवेगळ्या दिशेने पोलिस तपास करत आहेत. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपासातून उलगडा होणार आहे.  - अशोक उजगरे, सहायक पोलिस निरीक्षक, लातूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर