शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

आईचं 'खाकी वर्दीचं' स्वप्न लेकीने पूर्ण केलं; मेहनतीने PSI पदी निवड, वडिलांनी गावभर वाटले पेढे

By हरी मोकाशे | Updated: July 17, 2023 17:23 IST

पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी; मेहनतीच्या जोरावर शितल चिल्लेने केली आईची स्वप्नपूर्ती

- महेबूब बक्षीऔसा : लहानपणापासून आईचे पोलिस होण्याचे स्वप्न होते. पण, ती सातवीत असताना पितृछत्र हरवले. त्यामुळे तिचे स्वप्न अधुरे राहिले. आईचे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटीने अभ्यास करुन शितल चिल्ले हिने पहिल्याच प्रयत्नात पीएसआय परीक्षेत यश मिळविले आहे. आईची लेकीने स्वप्नपूर्ती केल्याने कुटुंबासह गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

औसा तालुक्यातील लामजना येथील शितल राजकुमार चिल्ले हिच्या कुटुंबांत आई- वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. वडिल सोसायटीचे सचिव आहे तर आई घरकाम करते. शितलचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर उच्च माध्यमिकचे शिक्षण औश्यातील कुमारस्वामी महाविद्यालयात झाले. तद्नंतर मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत सन २०१९ पासून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. अगदी पहिल्याच प्रयत्नात ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय परीक्षेत यशस्वी झाली. विशेष म्हणजे, एमपीएस परीक्षेत यश मिळविणारी ती गावातील पहिलीच मुलगी आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी ढोल -ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढून तिचे स्वागत करीत आनंदोत्सव साजरा केला.

मला पोलिस अधीक्षक व्हायचेय...३० वर्षांपूर्वी माझे आजोबा आईला पोलिस म्हणायचे. त्यामुळे आईनेही तेच स्वप्न पाहिले. परंतु, आजोबांच्या अकाली निधनाने ते शक्य झाले नाही. दरम्यान, मी मुलगी असतानाही आई- वडिलांकडून मिळालेल्या खंबीर साथीमुळे हे यश मिळविता आले. त्यातून आईची स्वप्नपूर्ती झाली. मी याच पदावर थांबणार नसून पुढे परीक्षा देणार आहे. पोलिस अधिक्षक होण्याची इच्छा आहे.- शितल चिल्ले.

मुलगा म्हणूनच शिकविलो...जग कितीही पुढे गेले असले तरीही आजही काही रुढी- परंपरा आहेत. बाहेरील वातावरण पाहता मुलीस पूर्णपणे स्वतंत्र देणे अशक्य आहे. पण आम्ही शितलला मुलगा समजून शिक्षण दिले. तिने या संधीचे सोने करीत आपले आयुष्य सफल केले आहे. त्याचा मनस्वी आनंद आहे.- राजकुमार चिल्ले, वडील.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाlaturलातूर