शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

ग्रामपंचायतीमधील वाद निवळणार; ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्ड राहणार

By हरी मोकाशे | Updated: July 22, 2023 19:32 IST

आता गाव कारभाऱ्यांच्या सोईनुसार बदलणार नाही ग्रामसभेचे प्रोसिडिंग!

लातूर : काही गावांतील ग्रामपंचायतीचे कारभारी ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयात आपल्या सोयीचे निर्णय अलगदपणे समाविष्ट करुन त्यानुसार प्रोसिडिंग लिहून घेतात. काही महिन्यानंतर गावात एखादी मोठी समस्या निर्माण झाल्यानंतर यासंदर्भात ग्रामसभेत निर्णय घेतल्याचे दाखवून प्रोसिडिंग सर्वांसमाेर सादर करतात. त्यामुळे गावकरी अन् कारभाऱ्यांत वाद निर्माण होण्यास सुरुवात होते. अशा वादांचा निपटारा व्हावा म्हणून केंद्र शासनाने ग्रामसभांच्या कामकाजाच्या नोंदी ॲपद्वारे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ग्रामसभेतील निर्णयांचे ऑडिओ- व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.

ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामपंचायत सर्वात महत्त्वाची आहे. गावकऱ्यांना मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर गावच्या विकासाचे कार्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होते. प्रत्येक ग्रामपंचायतीने वर्षभरात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. ग्रामसभेच्यानिमित्ताने गावकरी समस्या मांडण्याबरोबरच विकासात्मक कामासंदर्भात काही सूचनावजा माहिती देऊन नियोजन सांगतात.ग्रामसभेत कोणते निर्णय घेण्यात आले, याची माहिती व्हावी म्हणून प्रोसिडिंग लिहिले जाते. दरम्यान, काही गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामसभेतील निर्णयात आपल्या सोयीने बदल करुन तशा पध्दतीने प्रोसिडिंग लिहिल्याचे बऱ्याच वेळेस निदर्शनास येते. अशा घटनांना आळा बसावा. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात आणखीन पारदर्शकता येवून कार्यक्षमता वाढावी म्हणून केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाने आणि राज्याच्या प्रकल्प संचालकांनी ग्रामसभेच्या कामकाजाच्या नोंदी जीएस निर्णय ॲपद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत.

कागदाेपत्री ग्रामसभांना बसणार आळा...काही गावांमध्ये ग्रामसभा होत नाहीत. केवळ कागदाेपत्री ग्रामसभा होते. अशा गावांतील कारभारी आपल्या सोयीचे निर्णय गावासाठी लागू करतात. परिणामी, गावचा अपेक्षित प्रमाणात विकास होत नाही. आता या नव्या निर्णयाने कागदोपत्री ग्रामसभांना आळा बसणार आहे.

ग्रामसभेचा द्यावा लागणार सारांश...राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत जीएस निर्णय हे ॲप निर्माण करण्यात आले आहे. हे ॲप सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावयाचे आहे. ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयाचा सारांश किमान २ मिनिटांपासून ते जास्तीत जास्त १५ मिनिटाच्या कालावधीत ऑडिओ आणि व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करावयाचा आहे. त्यानंतर तो सदरील ॲपवर अपलोड करावयाचा आहे.

गटविकास अधिकारी करणार पडताळणी...तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामसभा झाली की नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ते अपलोड केलेले व्हिडिओ पाहून पुढील कार्यवाही करणार आहेत.

ग्रामसेवकांनी ॲपचा वापर करावा...राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाअंतर्गत आता प्रत्येक ग्रामसभेतील कामकाजाची माहिती ही जीएस निर्णय ॲपद्वारे नोंदवायची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामात पारदर्शकता येईल. ग्रामसभेत कोणते निर्णय घेण्यात आले याची माहिती सहजरित्या उपलब्ध होईल. ग्रामसभेच्या प्रोसिडिंगमध्ये कुठलाही बदल करता येणार नाही.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरgram panchayatग्राम पंचायत