जिल्ह्यातील लॅबमध्ये ठरवून दिलेल्या दरातच चाचणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:44+5:302021-05-13T04:19:44+5:30

दरफलकामुळे नागरिकांत जनजागृती... महापालिका प्रशासनाच्या वतीने खाजगी लॅबमध्ये योग्य दर आकारले जात आहेत की नाही या पडताळणीसाठी पथके नियुक्त ...

Tested at a fixed rate in a district lab! | जिल्ह्यातील लॅबमध्ये ठरवून दिलेल्या दरातच चाचणी !

जिल्ह्यातील लॅबमध्ये ठरवून दिलेल्या दरातच चाचणी !

Next

दरफलकामुळे नागरिकांत जनजागृती...

महापालिका प्रशासनाच्या वतीने खाजगी लॅबमध्ये योग्य दर आकारले जात आहेत की नाही या पडताळणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच दवाखाना, प्रयोगशाळेमध्ये चाचण्यांचे दर फलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात अधिकचा दर आकारल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शहरात खासगी लॅबमध्ये केवळ अँटिजन चाचणी होते. एकही लॅबमध्ये आरटीपीसीआर चाचणी होत नाही. ज्यांना आरटीपीसीआर चाचणी करायची आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

प्रत्येक ठिकाणी दर फलक लावणे बंधनकारक केले असल्याने अधिकच्या दर आकारणीला आळा बसला आहे. दरम्यान, अधिकचे दर आकारल्यास रुग्णांच्या नातेवाईकांना मनपाच्या आराेग्य विभागाकडे तक्रार दाखल करता येते.

दर फलक बंधनकारक...

लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. त्यातच खासगी लॅबसाठी दर आकारण्याबाबत मनपाच्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाला दर फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांपासून विविध चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे लॅब चालकांनी सांगितले.

रॅपिड अँटिजन चाचणी - १५०

सीबीसी चाचणी - २००

सीआरपी चाचणी - ४००

डी-डायमर चाचणी - १५००

एलएफटी चाचणी - ७००

केएफटी चाचणी- २५०

Web Title: Tested at a fixed rate in a district lab!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.