शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

औशाजवळ भीषण अपघात, काळी पिवळी-जीपची समोरासमोर धडक; तीन ठार, 13 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 00:16 IST

अपघातातील मृतांचे नातलग सोबत नसल्याने उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही. अपघातातील इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी आहेत.

 

लातूर- औसा-लामजना मार्गावरील वाघोली पाटीजवळ बोलेरो जीप व काळीपिवळीचा शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर आहेत. तर १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती.

प्रवासी वाहतूक करणारी काळीपिवळी एमएच २४ एफ ०९५९ ही औशाहून लामजन्याकडे प्रवासी घेऊन जात होती. तर लामजन्याहून औशाकडे भरधाव येणाऱ्या एमएच-३०- एए ४८०९ क्रमांकांच्या बोलेरो जीपची वाघोली पाटीजवळ समोरासमोरधडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की यात काळीपिवळी जीपचा चक्काचूर झाला तर बोलेरो १५० फुट लांब जावून खड्ड्यात पडली. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर एकाचा लातूर येथे उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अपघातातील मृतांचे नातलग सोबत नसल्याने उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही. अपघातातील इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी आहेत. सर्वांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी औसा पोलिसांनी पाहणी करून वाहतूक सुरळीत केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांनीही घटना स्थळाला भेट दिली.

दरवाजे तोडून बाहेर काढले प्रवासी...अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. जखमीसह मृतांनाही जीपचे दरवाजे तोडून बाहेर काढावे लागले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमधील मयत असल्याने नेमकी कोण कोठून बसले, कोणत्या गावातील होते याची माहिती पोलिसांनाही नव्हती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मयत व जखमींची नावे कळली नसल्याचे औसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरDeathमृत्यू