दहावीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:49+5:302021-07-01T04:14:49+5:30
गुणदान केलेली माहिती ऑनलाइन भरण्यासाठी दोन जुलै पर्यंतची मुदत लातूर: दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांकडून विद्यार्थ्यांना गुणदान दिले जाणार आहे. ...

दहावीचा
गुणदान केलेली माहिती ऑनलाइन भरण्यासाठी दोन जुलै पर्यंतची मुदत
लातूर: दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांकडून विद्यार्थ्यांना गुणदान दिले जाणार आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले असून, यामुळे शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. वेळेत निकाल न दिल्यास शाळांना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना निकालाच्या गुणदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागत आहे.
लातूर बोर्ड अंतर्गत लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यातून दहावीसाठी१ लाख १० हजार ३५४ विद्यार्थी आहेत. यापैकी ४ हजार ४३७ विद्यार्थी रीपिटर आहेत. नियमित विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५ हजार ९१७ आहे. यात लातूर जिल्ह्यात ४२ हजार ५०९, उस्मानाबाद जिल्ह्यात २२ हजार ६७५ तर नांदेड जिल्ह्यात ४५ हजार १७० विद्यार्थी दहावीला आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती २ जूनपर्यंत बोर्डाकडे ऑनलाइन सादर करणे अनिवार्य आहे. ज्या शाळा वेळेत निकाल देणार नाहीत, त्या विलंबाला जबाबदार राहतील, असे राज्य शिक्षण मंडळाने कळविले आहे. त्यामुळे शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के शाळांनी निकालाची माहिती दिली असल्याचे लातूर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्ष निकालची माहिती संकलित करण्यासाठी लातूर आणि नांदेड जिल्ह्याला लातूर बोर्डाने गुरुवारचा वेळ दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांच्या निकालाची माहिती संकलित झाली असून जवळपास ९० टक्के माहिती आली असल्याचे बोर्डाचे संजय पाचंगे यांनी सांगितले. लातूर आणि नांदेड जिल्ह्याच्या दहावी निकालाची माहिती गुरुवारी संकलित होईल, असेही ते म्हणाले.