मुस्लीम समाजाला दहा टक्के आरक्षण द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:27+5:302021-06-19T04:14:27+5:30
राज्यातील वक्फच्या जमिनीवरील अतिक्रमणे तत्काळ काढण्यात यावीत आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्यात यावे. वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक ...

मुस्लीम समाजाला दहा टक्के आरक्षण द्यावे
राज्यातील वक्फच्या जमिनीवरील अतिक्रमणे तत्काळ काढण्यात यावीत आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्यात यावे. वक्फ संपत्तीचा अहवाल सार्वजनिक करावा, मुस्लीम समाजावर दिवसेंदिवस वाढत असलेला अत्याचार रोखण्यासाठी अल्पसंख्याक अन्याय-अत्याचार प्रतिबंधक सरंक्षण कायदा तयार करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन मुस्लीम समाजबांधवांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे अय्याज शेख, कलिमोदीन शेख, उस्मान बागवान, दस्तगीर शेख अजहर बागवान, नगरसेवक ताजोद्दीन सय्यद, अशोक सोनकांबळे, हाफीज जावेद, इमरोज पटवेगर, शेखू भाई, अफरोज पठान, हुसेन मनियार, फारूक मनियार, मजर हाफेसाब, राशेद हाफेसाब, मोबीन शेख,
मेेेेहमूद सय्यद, अनीस कुरेशी, मजीद सय्यद, हाजी शेख, जमू बागवान, महेबूब बागवान, कलीम तंबोली, इब्राहिम बिस्ती, आवेज शेख, रमजान शेख, माजिद बागवान यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.