साखरा पाटी येथे टेम्पो-छोटा हत्तीचा अपघात; चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:31+5:302021-03-27T04:20:31+5:30
पोलिसांनी सांगितले, भरधाव टेम्पो (एमएच २४ जीसी २२४९) मुरुडकडून लातूरच्या दिशेने शेतीमाल घेऊन निघाला होता. तर छोटा हत्ती (एमएच ...

साखरा पाटी येथे टेम्पो-छोटा हत्तीचा अपघात; चालक जागीच ठार
पोलिसांनी सांगितले, भरधाव टेम्पो (एमएच २४ जीसी २२४९) मुरुडकडून लातूरच्या दिशेने शेतीमाल घेऊन निघाला होता. तर छोटा हत्ती (एमएच १२ जेएफ ५५०३) हा लातूर येथून मुरुडच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, साखरा पाटीनजिक वळण रस्त्यावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, टेम्पोचा समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात टेम्पो चालक धनराज बाबुराव मोठे (४०, रा. चिंचोली माळी, ता. केज जि. बीड) हे जागीच ठार झाले. तर छोटा हत्तीमधील नवनाथ कांबळे (३०) आणि व्यंकट कांबळे (२८, दोघेही रा. बोरगाव काळे, ता. लातूर) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गातेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. नवले, जमादार पांडुरंग दाडगे, जी.एल. गिरी, बाबुराव डापकर यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. अपघाताची नोंद गातेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
फोटो कॅप्शन :
लातूर-बार्शी महामार्गावरील साखरा पाटीनजिक येथे टेम्पो आणि छोटा हत्तीचा शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातातील वाहने.
फोटो फाईल नेम :
२६एलएचपी ॲक्सीडेंट१.टीफ,
२६एलएचपी ॲक्सीडेंट२.टीफ,
२६एलएचपी ॲक्सीडेंट३.टीफ