औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा वाढला @ ३८.५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:55+5:302021-03-08T04:19:55+5:30
दरम्यान, यावर्षी परतीचा चांगला पाऊस झाल्याने १ हजार २०० हेक्टरवर रब्बी हंगामात सिंचन झाले आहे. औराद शहाजानी परिसरात तापमानाचा ...

औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा वाढला @ ३८.५
दरम्यान, यावर्षी परतीचा चांगला पाऊस झाल्याने १ हजार २०० हेक्टरवर रब्बी हंगामात सिंचन झाले आहे.
औराद शहाजानी परिसरात तापमानाचा पारा वाढल्याने दुपारी रस्ते निर्मनुष्य असल्याचे दिसून येत आहे.
सध्या शेतकऱ्यांनी पपई, केळी बागांची आणि भाजीपाल्याची लागवड केली आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ३८ अंशांच्या वर गेला आहे. यामुळे पुढील महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. औराद शहाजानी परिसर हा तेरणा आणि मांजरा नद्यांच्या वाहणाऱ्या प्रवाहामुळे आणि या नद्यांवर उच्चस्तरीय व काेल्हापुरी बंधारे आहेत; पण गत वर्ष साेडले तर मागील पाच वर्षांत या भागातील कमी पावसामुळे पाणीटंचाई निर्माण झाली हाेती. या वर्षी चांगला पाणीसाठा झाला हाेता; परिणामी, सिंचनक्षेत्रात पुन्हा एकदा वाढ हाेऊन १ हजार २०० हेक्टरवर रब्बीचा हंगाम पाेहोचला आहे. बारमाही सिंचन तर ३ हजार हेक्टरांवर पाेहोचले आहे. यामध्ये तेरणा व मांजरावरील पाच बंधाऱ्यांचे उच्चस्तरीयमध्ये रूपांतर करून बारमाही पाणी थांबले. याचाच सिंचनावर वाढीवर परिणाम झाला आहे. यातूनच ऊस, भाजीपाला, फळबागांसह हंगामी पाण्यावर पिके घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
आठवड्यातील तापमानाचा आलेख...
औराद तापमान मार्च महिन्यात
कमाल किमान बाष्पीभवन
दिनांक ७ मार्च कमाल - ३८.५ किमान - १८.००, ६ मार्च - कमाल - ३७.५, किमान - १७. ३२, ५ मार्च - कमाल - ३६.००, किमान - १६.००, ४ मार्च - कमाल - ३७.००, किमान - २१.००, ३ मार्च - किमान - ३६.०० कमाल - २२.००, २ मार्च - किमान - ३६.५ कमाल - २२.००, १ मार्च राेजी किमान तापमान - ३५.००, कमाल - २५.०० अंश आहे. तापमानाचा पारा आणखी वाढेल, असे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे म्हणाले.
बंधाऱ्यांतील पाणीसाठ्यात हाेतेय घट...
वाढत्या तापमानामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठ्यातही दिवसेंदिवस घट हाेत आहे.
वांजरखेडा बंधारा काेरडा पडला आहे. तगरखेडा - १० टक्के, औराद - ४० टक्के, साेनखेड - काेरडा, गुंजरगा ४० टक्के, लिंबाळा - काेरडा, मदनसुरी बंधारा - ४० टक्के जलसाठा आहे. याबाबत जलसिंचन विभागाचे शाखा अभियंता एस.आर. मुळे म्हणाले, बाष्पीभवन वाढत असल्याने पाणीपातळीत घट हाेत आहे. लाल काेळीचा प्रादुर्भाव औराद परिसरातील भाजीपाल्यावर अधिक आहे. परिणामी, उत्पादनात माेठ्या प्रमाणावर घट हाेत आहे.