टीम अव्होपाचा लॉयन्स क्लबतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:16 AM2021-01-09T04:16:02+5:302021-01-09T04:16:02+5:30

उदगीर : येथील आर्यवैश्य ऑफिशियल ॲण्ड प्रोफेशनल असोसिएशन (अव्होपा) या सामाजिक संघटनेने कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रम राबविल्याने ...

Team Avhopa felicitated by Lions Club | टीम अव्होपाचा लॉयन्स क्लबतर्फे सत्कार

टीम अव्होपाचा लॉयन्स क्लबतर्फे सत्कार

Next

उदगीर : येथील आर्यवैश्य ऑफिशियल ॲण्ड प्रोफेशनल असोसिएशन (अव्होपा) या सामाजिक संघटनेने कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रम राबविल्याने लाॅयन्स क्लब, सनरायजर्स व बसव ब्रिगेड यांच्यातर्फे ‘कोरोना योद्धा’ म्हणून ‘टीम अव्होपा’चा बुधवारी सत्कार करण्यात आला.

येथील अव्होपा या संघटनेकडून ह. भ. प. रंगनाथ महाराज अन्नछत्र योजनेतून कोरोना रुग्ण आणि गृह विलगीकरणातील नागरिकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. टाळेबंदीत घरपोच किराणा, औषधे व गरजेच्या वस्तूही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून अव्होपाचे सचिव प्रा. सुनील वट्टमवार, प्रोजेक्ट प्रमुख विजयकुमार गबाळे, अनिल मारमवार, देविदास पारसेवार, संजय संगुळगे, संजय पत्तेवार आदींचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. रामप्रसाद लखोटिया, लाॅयन्स क्लब, उदगीर सनरायजर्सचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश वट्टमवार, सचिव शिवम चणगे, डॉ. संदीप सोनटक्के, विवेक जैन, अभिजीत औटे, प्राचार्य दत्ता पाटील, बसव ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर पटणे आदी उपस्थित होते.

Web Title: Team Avhopa felicitated by Lions Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.