लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, वनिता काळे, रजनी जोशी, गिरीजा लोंढे, तोळण देशमुख, सुरेखा बारसुळे, शांता कोकणे, उल्का गुडे, विश्वनाथ खंदाडे, दयानंद बानापुरे, संभाजी मुंडे, सतीश मारकोळे, अंगद चामवाड, बालाजी भोळे, मनोज भिसे, पद्माकर आयनाले, अशोक खानापुरे, बालाजी बिरादार, बुद्धगीर गिरी, गणेश नराळे, धनंजय तोकले, महेश सूर्यवंशी, युवराज माने, गोविंद पडीले, शेषकुमार आकनगिरे, गणेश मरेवाड, वजीर शेख, सुरेश वंगवाड, अरविंद वाडकर, प्रकाश बंडापल्ले, विजयकुमार पाटील, सत्यवान माचपल्ले आदींसह पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.