टँकरने पाणी देऊन जगविली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:44+5:302021-04-10T04:19:44+5:30
तालुक्यात वनविभागाचे ९४६ हेक्टर क्षेत्र असून त्यात उजना, हगदळ, गुगदळ, शेन्नी, उमरगा येल्लादेवी, राळगा, रुई आदी ...

टँकरने पाणी देऊन जगविली झाडे
तालुक्यात वनविभागाचे ९४६ हेक्टर क्षेत्र असून त्यात उजना, हगदळ, गुगदळ, शेन्नी, उमरगा येल्लादेवी, राळगा, रुई आदी गावाचा समावेश आहे. त्या ठिकाणी शासनाच्या विविध योजनातून वृक्षांची लागवड करण्यात आली. शेकडो हेक्टरवरील झाडे उन्हाळ्यात जगविण्यासाठी काही ठिकाणी टँकरच्या साह्याने तर काही ठिकाणी बोरवेलच्या साह्याने जगविण्यात आली आहेत. तसेच तालुक्यात २३ ठिकाणे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. उन्हाळ्यात वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणवठे टँकरच्या पाण्याने भरण्यात येत आहेत.
अहमदपूर तालुक्यात वनाचे प्रमाण सर्वात कमी असल्यामुळे शासनाच्या योजना प्रमाणे सदर झाडे लावण्यात आली आहेत. त्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. सांगोळे, वनपरिमंडळ अधिकारी एस.एम. कोम्पलवार, वनरक्षक आर.के. केसाळे, वनरक्षक राहुल कलशेट्टी आदी परिश्रम घेत आहेत.