ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यासाठी ताेबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:27+5:302020-12-31T04:20:27+5:30
अहमदपूर येथील तहसील कार्यालयात निवडणूक कामासाठी १३०७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त कले आहेत. उमेवादरी अर्ज भरण्यासाठी अनेक जण आपल्या ...

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्यासाठी ताेबा गर्दी
अहमदपूर येथील तहसील कार्यालयात निवडणूक कामासाठी १३०७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त कले आहेत. उमेवादरी अर्ज भरण्यासाठी अनेक जण आपल्या कार्यकर्त्यांसोबत येत मोठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. ३० डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. यासाठी २० निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी २० नियुक्त केले आहेत. कोविड काळात फॉर्म भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन टाळून कमीत कमी १ आणि जास्तीत जास्त ३ व्यक्ती सोबत आणण्याचे नियम हाेताे. मात्र, अहमदपूरमध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. यातून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन झाले. अनेक जण मास्कचाही वापर करत नसल्याचे दिसून आले. एकीकडे पालिका प्रशासन सामान्य नागरिकांना मास्क न घालणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे याबाबत दंड ठोठावत आहे. मात्र, शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर गर्दी करीत असतानाही, प्रशासनाकडून बघ्याची भूमिका घेण्यात आली. उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज ऑनलाईन तथा ऑफलाईन भरण्यासाठी निवडणूक विभागाने परवानगी दिली आहे. महा ई-सेवा केंद्र अथवा ऑनलाईन भरून त्याची प्रत काढून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ती जमा करावयाची होती.मात्र, शेकडोंच्या संख्येने गर्दी कार्यालयाबाहेर झाल्याचे दिसून आले.
१३०७ कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती...
अहमदपूर तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक हाेत आहे. यासाठी ८४० मतदान अधिकारी, कर्मचारी, शिपाई - १८०, पोलीस कर्मचारी - १५०, निवडणूक निर्णय अधिकारी - २०, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी - २०, झोनल अधिकारी - २०, मास्टर ट्रेनर - २७, इतर कर्मचारी - ५० असे एकूण १ हजार ३०७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
फोटो कॅप्शन : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अहमदपूर येथील तहसील कार्यालय परिसरात बुधवारी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.