अन् चालक झाला मालक, सोनवळा सरपंचपदी सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:41+5:302021-02-14T04:18:41+5:30
कारचालक असलेल्या राहूर सूर्यवंशी याने आपल्या गावात ग्रामंपचात निवडणूक लढविली. मतदारांनी त्याच्या पारड्यात मते टाकले आणि ताे विजयी झाला. ...

अन् चालक झाला मालक, सोनवळा सरपंचपदी सूर्यवंशी
कारचालक असलेल्या राहूर सूर्यवंशी याने आपल्या गावात ग्रामंपचात निवडणूक लढविली. मतदारांनी त्याच्या पारड्यात मते टाकले आणि ताे विजयी झाला. याेगा-याेगाने गावाच्या सरपंच पदाचे आरक्षणही अनुसूचित जाती-जमातीसाठी जाहीर झाले. राहुल सूर्यवंशी याने सरपंचपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याची सरपंच म्हणून बिनविराेध निवड झाल्याचे घाेषित करण्यात आले. आतापर्यंत वाहनाचा चालक असलेला गावचा कारभारी झाल्याने ताे मालकच झाला आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून राहुलने आपले करीअर घडविले आहे. राेजगार करत करत वाहन चालक म्हणून त्याने गावात ग्रामपंचायत निवडणूक लढविली. गेल्या २० वर्षांपूर्वी राहुल सूर्यवंशी हा चंदन पाटील यांच्याकडे चालक म्हणून नाेकरी करताे. गावात चंदन पाटील यांच्याच गटाचे २५ वर्षापासून वर्चस्व आहे. ५ फेब्रुवारी रोजी चालक राहुल ईरवंत सूर्यवंशी यांच्या गळ्यात बिनविरोध सरपंच पदाची माळ पडली. गरीब कार्यकर्ता गावचा कारभारी झाल्याने सामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
माझा वाघ आता गावचा कारभारी झालाय...
माझा वाघ आता साेनवळा गावाचा कारभारी झाला आहे, याचे मला समाधान आहे, अशी प्रतिक्रिया माउलीने दिली आहे. आता वाहनाच्या स्टेअरिंगबराेबरच गावाचा कारभार राहुल करणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असून, सामान्यांचा विकास हाच आपला विकासाचा अजेंडा राहणार आहे, असे राहुल सूर्यवंशी याने सांगितले. यावेळी कॉ. राजू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य चंदन पाटील, श्रीपती मुंडे, गोपीनाथ नागरगोजे, डी.एन. नगर यांनी नूतन सरपंचाचा सत्कार केला.