गावठाणामधील मालमत्तांच्या सर्वेक्षणाला ड्रोनद्वारे प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:31+5:302021-03-07T04:18:31+5:30
देवणी तालुक्यातील गावठाण जमिनीवर वस्त्या आहेत. शिवाय, गावठाण हद्द किती, याची सीमा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वामीत्व योजनेंतर्गत ...

गावठाणामधील मालमत्तांच्या सर्वेक्षणाला ड्रोनद्वारे प्रारंभ
देवणी
तालुक्यातील गावठाण जमिनीवर वस्त्या आहेत. शिवाय, गावठाण हद्द किती, याची सीमा निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वामीत्व योजनेंतर्गत सर्वे आँफ इंडियाकडून हे भारतीय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. देवणी तालुक्यात यापूर्वी १२ गावांमध्ये सीटीसी सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता उर्वरित हंचनाळ, संगम, वागदरी, अजनी, सावरगाव, भोपणी, गुरधाळ, नागराळ, कमालवाडी, नेकनाळ, ममदापूर, सय्यदपूर, दरेवाडी, हिसामनगर, इस्मालवाडी, अचवला, अनंतवाडी, बोंबळी (बु.), बोंबळी (खु.), महादेववाडी, आनंदवाडी, बोळेगाव, वडमुरंबी, अंबानगर, सिंधीकामट, गुरनाळ, आंबेगाव, इंद्राळ, बटनपूर या गावात भुमीअभिलेख कार्यालय, देवणी, चाकूर आणि जळकोट तालुक्याच्या पथकाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. गावठाणचे सीमांकन आणि हद्द कायम करून गावठाणच्या मिळकतीतील लाभार्थ्यांना (मालमत्ताधारकांना) जीएसआय प्रणालीवर आधारित सनद मिळणार आहे.
याकामी ओ.एच. हिंडे,पी.आर. गुरमे, एस.डी. मिटकरी, व्ही.जी. महापुरे यांच्यासह भूमापक परिश्रम घेत आहेत. यासाठी त्या-त्या गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.