अनुसूचित जाती प्रवर्गातील काेराेना मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:53+5:302021-07-01T04:14:53+5:30
व्यवसायासाठी एक लाख ते पाच लाखांपर्यंत, एनएसएफडीसी सहभाग ८० टक्के, भांडवल अनुदान २० टक्के, व्याजदर ६ टक्के आणि परतफेडीचा ...

अनुसूचित जाती प्रवर्गातील काेराेना मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार आधार
व्यवसायासाठी एक लाख ते पाच लाखांपर्यंत, एनएसएफडीसी सहभाग ८० टक्के, भांडवल अनुदान २० टक्के, व्याजदर ६ टक्के आणि परतफेडीचा कालावधी ६ वर्षांचा राहणार आहे. अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये ३ लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ६० च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता पुढीलपैकी एक दस्तऐवज आवश्यक आहे. महानगर पालिका, नगर पालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. स्मशानभूमी प्राधिकरणाने दिलेली पावती. एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र. आवश्यक कागदपत्रे, मयत व्यक्तीचे नाव पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, कोविड-१९ ने मरण पावलेल्या व्यक्तिचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड आणि वयाचा पुरावा.
कोविड - १९च्या प्रादुर्भावामुळे १५ जून २०२१पर्यंत मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा संकेतस्थळावर अर्ज भरावेत, असे जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लातूर यांनी कळविले आहे.