शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
4
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
5
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
6
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
7
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
8
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
10
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
11
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
12
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
13
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
14
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
15
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
16
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
17
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
18
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
19
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
20
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरणी कालवा सिंचनाचा ६०० हेक्टर्सवरील उसाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST

एस.आर.मुळे शिरूर अनंतपाळ : घरणी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील उसासह रबी पिके जगविण्यासाठी आजपर्यंत दोन आवर्तन ...

एस.आर.मुळे

शिरूर अनंतपाळ : घरणी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील उसासह रबी पिके जगविण्यासाठी आजपर्यंत दोन आवर्तन पूर्ण आले आहेत. मंगळवारपासून तिसरे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे घरणी धरणाच्या कालवा सिंचनाचा ६०० हेक्टर्स मधील उसाला लाभ झाला असून, तिसऱ्या आवर्तनात दोन्ही कालव्याद्वारे १.५० दलघमी पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

मागील वर्षी घरणी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यामुळे घरणी धरणाच्या पाणीसाठ्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला लाभ व्हावा म्हणून येथील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी उपविभागीय कार्यालयातील स्टाफच्या मदतीने उन्हाळी हंगामातील पिकांना कालवा सिंचनाचा भरघोस लाभ देण्यासाठी सिंचन वेळापत्रकाचा कृती आराखडा आखला. त्यानुसार धरणातील ७.८२० दलघमी उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी कालवा सिंचनाचे तीन आवर्तने निश्चित करण्यात आली. यासाठी राजेंद्र पांचाळ, संतोष म्हैशेवाड, एस.पी केजकर, गोविंदराव मोरे यांच्या नेतृत्वातील सिंचन पथक स्थापन करण्यात आले. सिंचन पथकाने आजपर्यंत दोन आवर्तन पूर्ण केले आहेत. मंगळवारपासून तिसरे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कालवा सिंचनाचा तालुक्यातील ६०० हेक्टर्स मधील पिकांना लाभ झाला आहे.

धरणाच्या साठ्यावर ४५० हेक्टर्स ऊस....

घरणी मध्यम प्रकल्प असल्याने धरणाचा पाणीसाठा मोठा आहे. मागील वर्षी घरणी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे साठ्यातील पाण्याचा लाभ घेऊन अनेक गावातील शेतकऱ्यांनी ४५० हेक्टर्स मध्ये उसाची लागवड केली आहे. तर धरणाच्या दोन्ही कालवा सिंचनाद्वारे १५० हेक्टर्स ऊस अशा एकंदर ६०० हेक्टर्सला कालवा सिंचनाचा लाभ झाला आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करावा....

घरणी धरणात आता केवळ ५.१९७ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तरीही पाटबंधारे विभागाने तिसरे आवर्तन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी थकीत पाणीपट्टी भरुन तिसऱ्या आवर्तनातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता गोरख जाधव यानी केले आहे.

आठवडाभर आवर्तन चालणार....

घरणी धरणाच्या पाणीसाठ्यावर ४५० हेक्टर्स तर दोन्ही कालव्यावर १५० हेक्टर्स असा एकंदर ६०० हेक्टर्सवर ऊस असून, उसाच्या पिकाला अधिकचे पाणी लागते. त्यामुळे उजव्या कालव्यातून २५ क्यूसेक्स तर डाव्या कालव्यातून २० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत असून सदरील आवर्तन आठवडाभर चालणार असल्याचेही उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी सांगितले.