शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रोगमुक्तीची अशीही अंधश्रध्दा; डबक्यातल्या पाण्यासाठी तोबा गर्दी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 23:05 IST

दोन महिन्यांपासून रीघ: दमा, मधुमेह, मुतखड्यावर इलाजाची अफवा

ठळक मुद्देएकंबीवाडी (ता. औसा) येथे वनविभागाची ११० एकर जमीन असून तिथे विविध जातीचे वृक्ष, आयुर्वेदिक वनस्पती आहेत. तसेच ५ पाझर तलाव आहेत. याच भागात एक डबके आहे.

समाधान कोळी उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील एकंबीवाडीतील वनविभागाच्या क्षेत्रात असलेल्या एका डबक्यातील पाणी प्यायल्याने दमा, मधुमेह, रक्तदाब, अंगदुखी, मुतखडा हे आजार कमी होतात, अशी अफवा कोणीतरी पसरविली. त्यामुळे दोन महिन्यांपासून दररोज २०० ते २५० नागरिक तेथील पाणी नेण्यासाठी गर्दी करीत आहे.

एकंबीवाडी (ता. औसा) येथे वनविभागाची ११० एकर जमीन असून तिथे विविध जातीचे वृक्ष, आयुर्वेदिक वनस्पती आहेत. तसेच ५ पाझर तलाव आहेत. याच भागात एक डबके आहे. या डबक्यात येणाऱ्या पाण्यात वनस्पतींच्या मुळातील रस मिसळतो. हे पाणी पिल्याने दमा, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायू, अंगदुखी, मुतखडा, गुडघेदुखी, पित्त अशा विविध प्रकारचे आजार कमी होतात, अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून एकंबी, टाका, उजनी, बिरवली, चिंचोली, पाडोळी, टाकळी, कोंड, जगजी येथील नागरिक पाणी नेण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे, ही अफवा परजिल्ह्यापर्यंत पोहोचल्याने लातूरसह उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, बीड, नांदेड या जिल्ह्यातील काही नागरिकही पाणी घेऊन जात असल्याचे परिसरातील शेतकरी लिंबराज चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, या डबक्याच्या भोवती दगडाचे कडेही बांधण्यात आले आहे.

पाणी नमुन्याच्या अहवालाबाबत अनभिज्ञ...

वनविभागाच्या डबक्यातील नागरिक काही दिवसांपासून पाणी घेऊन जात आहेत. त्यामुळे आम्ही दोन महिन्यांपूर्वी पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. परंतु, त्यानंतर त्याची अद्यापही आम्हाला माहिती मिळाली नाही, असे एकंबीचे उपसरपंच जीवन चव्हाण यांनी सांगितले.

शास्त्रीय आधार नाही...

डबक्यातील पाण्यामुळे काही आजार कमी होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र, या पाण्याची कुठलीही तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे कुठलाही शास्त्रीय आधार नाही, असे लातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी सांगितले.

भूलथापांना बळी पडू नये...

तपासणीनंतर ते पिण्यासाठी योग्य की अयोग्य याची माहिती मिळेल. सद्यस्थितीत नागरिकांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उजनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. देवणीकर म्हणाले. 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस