सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयाचे आयआरएसमध्ये यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:20+5:302021-08-24T04:24:20+5:30

लातूर : जुलै २०२१च्या बोर्ड परीक्षेत श्रीमती सुशिलादेवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून, कला, वाणिज्य, विज्ञान ...

Success of Sushiladevi Deshmukh College in IRS | सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयाचे आयआरएसमध्ये यश

सुशिलादेवी देशमुख महाविद्यालयाचे आयआरएसमध्ये यश

लातूर : जुलै २०२१च्या बोर्ड परीक्षेत श्रीमती सुशिलादेवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून, कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी या शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बारावी बोर्ड परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांपैकी विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण घेणाऱ्या एक टक्का विद्यार्थ्यांना इन्स्प्राईड रिसर्च स्कॉलरशीप दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी जान्हवी पलमटे, निर्मल सतीश काळे, अमित ढमाले हे तीन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रत्येकवर्षी ८ हजार रुपयांप्रमाणे ५ वर्षे अशी एकूण ४० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थाध्यक्ष, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी केले.

कॅप्शन :

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्याबद्दल प्राचार्य डॉ. अजय पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Success of Sushiladevi Deshmukh College in IRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.