जेईई मेन प्रथम परीक्षेत शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:31+5:302021-03-10T04:20:31+5:30
संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सृष्टी भगवान जुनघरे हिने प्रथम, अभिषेक शिवकुमार सारडा द्वितीय, तर तेजस माकोडे याने ...

जेईई मेन प्रथम परीक्षेत शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे यश
संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सृष्टी भगवान जुनघरे हिने प्रथम, अभिषेक शिवकुमार सारडा द्वितीय, तर तेजस माकोडे याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. यासोबतच ओम दीपक राऊळ, देवश्री प्रकाश देऊळकर, साईनाथ साहेबराव रेनेवाड यांनी यश मिळविले आहे. भौतिकशास्त्र विषयात १० विद्यार्थी ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण घेणारे असून, रसायनशास्त्र व गणित या दोन्ही विषयात ९९ पर्सेंटाईल गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अनुक्रमे १२ व ६ आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी.आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सुनील सोनवणे, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य बी.ए. मैंदर्गी, उपप्राचार्या सुचेता वाघमारे, सीईटी सेल संचालक प्रा. दिलीप देशमुख, पर्यवेक्षक प्रा. एस.आर. बिराजदार, आयआयटी व एम्स बॅचचे समन्वयक प्रा. विनोद झरीटाकळीकर, प्रा. अभयसिंह देशमुख आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.