प्रयागबाई पाटील महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:02+5:302021-03-16T04:20:02+5:30

रोटरी क्लब ऑफ लातूर व्होराइजनतर्फे उपक्रम लातूर : शहरातील रोटरी क्लब ऑफ लातूर व्होराइजनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप ...

Success of Prayagbai Patil College | प्रयागबाई पाटील महाविद्यालयाचे यश

प्रयागबाई पाटील महाविद्यालयाचे यश

रोटरी क्लब ऑफ लातूर व्होराइजनतर्फे उपक्रम

लातूर : शहरातील रोटरी क्लब ऑफ लातूर व्होराइजनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. मल्लिकार्जुन हुलसुरे, नीळकंठ स्वामी, डॉ. गोपीकिशन भराडिया, बी.पी. सूर्यवंशी, आशिष बाहेती, डॉ. संजय गवई, अशोक सूर्यवंशी उपस्थित होते. गरजू विद्यार्थ्यांना क्लबच्या वतीने नेहमीच मदत केली जात असून, आगामी काळातही हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी माजी प्रांतपाल डॉ. विजयकुमार राठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात महिला दिन

लातूर : बाभळगाव येथील व्यंकटराव देशमुख महाविद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एम.एम. लोणीकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा.डॉ. जयदेवी पवार, पोलीस अधिकारी घंटे, प्रा.डॉ. नानासाहेब जाधव, प्रा. बिडवे, प्रा. शंकर माने, प्रा. कदम आदी उपस्थित होते. मुलींनी आत्मविश्वास बाळगून ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे, असे मत पोउपनि. एम.एम. लोणीकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम

लातूर : शहरातील महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी मनोज डोंगरे, प्रवीण शिवणगीकर, आदित्य इंगळे, श्रीकांत हाळे, पवन इंगळे, रोहित काळे, पीयूष शहा, रोहित डोंगरे, केदार घोलप, प्रशांत हिंगे, लखन इंगळे, शिवम राऊत, गंगाधर इंगळे, शुभम कोरे, प्रदीप काळे, ओम वाडकर, विशाल कदम, ओंकार फिस्के, अभिषेक गडदे आदींसह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

दयानंद महाविद्यालयात युवा संसद

लातूर : दयानंद कला महाविद्यालयात नेहरू युवा केंद्र व रासेयो विभागाच्या वतीने युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. दिलीप नागरगोजे, संजय ममदापुरे, डॉ. संतोष पाटील, ऋतुजा म्हेत्रे, चंद्रकांत फड, अल्फिया तांबोळी, राहुल चेबळे, बळीराम कानवटे, आशिष कुटवाडे, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. महेश जंगापल्ले, गोविंद कांबळे, निलेश लाडेकर, ऋषिकेश पवार, रणजित विभुते, ऋषिकेश आदमाने, मयुरी काळे उपस्थित होते.

अत्रिवरद प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार कार्यक्रम

लातूर : शहरातील अत्रिवरद प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह नितीन शेटे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण शिवणगीकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, सचिव जयकिरण परदेशी, विनोद चव्हाण, संदीप केंद्रे, आशिद बनसोडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

करिबसवेश्वर पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड

लातूर : लिंगायत महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करिबसवेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार, अरविंद पाटील, विनायक पाटील, हेमंत नेलवाडकर, प्राचार्य काशीनाथ राजे, नागनाथआप्पा भुरके, माणिकआप्पा कोकणे, चंद्रकांत काला-पाटील, तानाजी डोके, अशोक काडादी, शिवाजी भातमोडे, एन. आर. स्वामी आदींनी कौतुक केले आहे.

निलंगा शहरातून दुचाकीची चोरी

लातूर : निलंगा शहरातील दत्तनगर येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी (क्र. एमएच २४ झेड ३०२६) चोरीला गेल्याची घटना २ मार्च रोजी घडली. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात फिर्यादी बबन श्रीराम वडते (रा. दत्त नगर, निलंगा) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ झाली असून, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

भांडण सोडविण्यासाठी गेले असता मारहाण

लातूर : आई पैसे दे म्हणून मारहाण करीत असताना भांडण सोडविण्यासाठी गेले असता फिर्यादीस शिवीगाळ करून तू भांडण सोडविण्यास का आला म्हणून फरशीचा तुकडा डोक्यात मारला. तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याला फरशीने मारून जखमी केले. याप्रकरणी फिर्यादी सतीश शेषेराव धायगुडे (रा. गांधीनगर, अमन चौक) यांच्या तक्रारीवरून अभिजित शेषेराव धायगुडे यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. पवार करीत आहेत.

महापालिकेच्या वतीने शहरात फवारणी

लातूर : शहर महापालिकेच्या वतीने फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. धूर फवारणी तसेच सोडियम हायड्रोक्लोराइडची फवारणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात असून, त्याचाच एक भाग म्हणून विविध भागात फवारणी केली जात आहे. आगामी काही दिवसांत संपूर्ण शहरात ही फवारणी केली जाणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शहर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Success of Prayagbai Patil College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.