शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

लातुरातील दोस्तांची कमाल; उपेंद्र अन् कृष्णा यांच्या एआय बेस्ड स्मार्ट वॉचला पेटंट!

By हणमंत गायकवाड | Published: March 22, 2024 5:37 PM

दोघा मित्रांनी लॉकडाऊन काळात हाती घेतलेल्या प्रकल्पाला यश

लातूर :  युवा अभियंते उपेंद्र कुलकर्णी आणि कृष्णा देशपांडे यांना केंद्र सरकारचे इनोव्हेशन कॅटेगरी मधील सेफ्टी सेंसर बेस्ड टचस्क्रीन मल्टीफिचर्ड ड्युअल मोड वॉच सिस्टीमला पेटेंट मिळाले आहे.

लॉकडाऊन काळात उपेंद्र आणि कृष्णा यांनी एकाच डिव्हाइसमध्ये एक आयडिया घेऊन स्मार्ट वॉच तयार करण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केल्या आहेत. या प्रकल्पाला केंद्र शासनाचे पेटंट मिळाले. सर्व सोयी एकाच डिव्हाइसमध्ये देण्यासाठी एक आयडिया घेऊन  उपेंद्र आणि कृष्णा यांनी लॉकडाऊनमध्ये हा प्रोजेक्ट हाती घेऊन पूर्णत्वास नेला आहे.

या वॉचमध्ये ३० पेक्षा अधिक फिचर्स आहेत. जसे की, रेडियेशन इंडीकेटर, स्विच पॅनेल, वाय - फाय राउटर, कॅमेरा, मायक्रो प्रोजेक्टर, स्पीकर, शॉक अब्सॉरबर, मायक्रोफोन, एल. डी. आर सेंसर, चार्जर सॉकेट, इमरजन्सी बटन, सोलार पॅनेल, आरएफप्रोब, रिचार्जेबल बॅटरी, अँटिना, स्मार्ट ग्लास, अनालॉग घड्याळ, लॅम्प, युएसबी आदी फीचर्सचा समावेश आहे.

घड्याळ आर्टिफिशियल तंत्रज्ञानावर आधारित... या वाॅचला विशेष सेंसरचा केला वापर आहे. जसेकी, तापमान, ऑक्सिजन, हवा, गॅस लिकेज, स्मोक आणि फायर. शिवाय, यामध्ये असलेला अँटिना हा 20 Hz ते 5 GHz फ्रिक्वेन्सी साठी सपोर्ट करतात. आरएफ प्रोब  उच्चतर विद्युत विकिरण, समाविष्ट करून (रेडियो फ्रीक्वेंसी) विकिरण, उपयुक्त सेंसर आणि सर्किट्री वापरून, विद्युत विकिरणाचे माप करतो. २७ ऑगस्ट २०२० पासून वॉच तयार करण्याचे काम केले. आरएफ विद्युत विकिरणाचा एक भाग असून, प्रोब आरएफ फ्रिक्वेंसीसह इतर विद्युत विकिरणांचा निश्चित ध्येय देतो. पर्यावरणात उपस्थित इतर विद्युत विकिरणांचा माप करतो. अत्याधुनिक प्रकारातील हे घड्याळ आयओटी तंत्रज्ञान तसेच आर्टिफिशियल तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे उपेंद्र आणि कृष्णा यांनी सांगितले. अत्याधुनिक घड्याळ तीन फेजमध्ये तयार झाली आहे.

लातुरातील दोस्तांचे यश लातुरातील रहिवासी अन् सखे मित्र असलेल्या उपेंद्र आणि कृष्णा यांचे शालेय शिक्षण श्री केशवराज विद्यालयात झाले. उपेंद्रचे एम. ई इलेक्ट्रॉनिक्स शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मधून तर कृष्णाचे बी. टेक संगणक शाखेत श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथून झाले आहे. या दोघांनी ही स्मार्ट वॉच बनवली आहे.

टॅग्स :laturलातूरscienceविज्ञान