किनगावच्या होळकर विद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:46+5:302021-07-19T04:14:46+5:30
... संत मोतीराम महाराज विद्यालयाचे यश किनगाव : येथील श्री संत मोतीराम महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत ...

किनगावच्या होळकर विद्यालयाचे यश
...
संत मोतीराम महाराज विद्यालयाचे यश
किनगाव : येथील श्री संत मोतीराम महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सोमेश्वर चाटे याने प्रथम, भागवत दहिफळे याने द्वितीय, दिव्या फड हिने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व गुणवंतांचे संस्था सचिव प्रा. नरहरी फड, प्राचार्या सागरताई घुले, संजीव शिरसाठ, भाऊसाहेब मुंढे, संजीवकुमार देवनाळे, मारुती गीते, नागनाथ फड, आदींनी कौतुक केले आहे.
...
नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे यश
किनगाव : येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. विद्यालयातील अनुष्का वलसे, सोनाली मुंडे, वैशाखी कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवले आहेत. सर्व गुणवंतांचे कौतुक प्राचार्य प्रकाश कळसाईतकर, प्रा. लालासाहेब बोकडे, प्रमोद शिरुरकर, सुशीलकुमार पाटील, शीतल बेंबडे आदींनी केले.
...
किनगाव जिल्हा परिषद प्रशालेचे यश
किनगाव : येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश मिळवले आहे. प्रशालेतील अभिषेक पिटले याने प्रथम, कावेरी ठाकूर हिने द्वितीय, नितीन शृंगारे व फैजान पठाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. सर्व गुणवंतांचे मुख्याध्यापक सुभाष गव्हांडे, गोविंद चाटे यांच्यासह शिक्षकांनी कौतुक केले.
...
पी. ए. इनामदार उर्दू शाळेचे यश
किनगाव : येथील पी. ए. इनामदार उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत यश मिळवले आहे. शेख फुदैलल्लाह, पठाण आयशा, शेख मंतशासबा या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवले आहेत. सर्व गुणवंतांचे मुख्याध्यापक नशीबोद्दीन जाहगीरदार, प्राचार्य मोहम्मद मुक्सिद, शेख समीयोद्दीन, नजीब चौधरी, अकबर शेख आदींनी कौतुक केले.
...
भागिरथी विद्यालयाचे उज्ज्वल यश
किनगाव : येथील भागिरथी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे. विद्यालयातील सायली स्वामी हिने प्रथम, सुशील कांबळे याने द्वितीय, प्रेम बडगे याने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ. वसंतराव मुंडे, प्राचार्य संभाजी मुरकुटे, वैजनाथ मुरकुटे, रमेश सूर्यवंशी, दौलत मुंडे, महेश ढाकणे यांनी कौतुक केले.