रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुभद्रा घोरपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST2021-07-31T04:20:44+5:302021-07-31T04:20:44+5:30
लातूर : शहरातील ज्येष्ठांनी स्थापन केलेल्या रोटरी क्लब लातूर श्रेयसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ममता सभागृहात पार पडला. अध्यक्षपदी ...

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सुभद्रा घोरपडे
लातूर : शहरातील ज्येष्ठांनी स्थापन केलेल्या रोटरी क्लब लातूर श्रेयसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ममता सभागृहात पार पडला. अध्यक्षपदी सुभद्रा घोरपडे, सचिवपदी ज्योती हालिंगे तर कोषाध्यक्ष पदाची सूत्र कलाप्पा मानकर यांनी स्वीकारली.
यावेळी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, माजी प्रांतपाल रवींद्र साळुंखे, सहायक प्रांतपाल संतोष कासले उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक अध्यक्ष डॉ. मायाताई कुलकर्णी यांनी या क्लबने चार वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे यांनी रोटरीचे देश व जागतिक पातळीवरील सामाजिक कार्याचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाला माजी प्रांतपाल हरिप्रसाद सोमानी, विजय राठी, डॉ. मधुकरराव कुलकर्णी, डॉ. मायाताई कुलकर्णी, डॉ. सुचित्रा भालचंद्र, डॉ. करूणा कुलकर्णी, शुभदा रेड्डी, नगरसेविका स्वाती घोरपडे, व्यंकटेश हालिंगे, इंदुमती सावंत, सरोज अग्रवाल, संजीवनी कडतने, माजी अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, डॉ. गोपालकृष्ण कुलकर्णी, कर्नल शिवराज मिसाळ, रमेश जोशी, शकुंतला यादव, डॉ. विश्वास कुलकर्णी, अनुजा कुलकर्णी, ज्योती पोरे, नानिक जोधवानी, सतीश कडेल, डॉ. प्रभाकर देशमुख, डॉ. सतीश पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भास्कर बोरगावकर, वैशाली ढगे यांनी केले.