यशवंत विद्यालयात विद्यार्थ्यांना शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:17 IST2021-01-02T04:17:04+5:302021-01-02T04:17:04+5:30
वसुंधरा रक्षणासाठी आपली जबाबदारी म्हणून नागरिकांनी आपला सहभाग नाेंदविला. १ ते १५ जानेवारी या कालावधीत माझी ...

यशवंत विद्यालयात विद्यार्थ्यांना शपथ
वसुंधरा रक्षणासाठी आपली जबाबदारी म्हणून नागरिकांनी आपला सहभाग नाेंदविला. १ ते १५ जानेवारी या कालावधीत माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘हरित शपथ’ घेण्यात आली. अहमदपूर शहरात हा उपक्रम राबविला जात आहे. यावेळी नगरपालिकचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, सिद्धार्थ आचार्य, स्वच्छता निरीक्षक ढोबळे, योगेश चव्हाण, एम. मुंडे आदींनी पुढाकार घेतला आहे.
यावेळी यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी बिरादार, उपमुख्याध्यापक पुरुषोत्तम डांगे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, रमाकांत कोंडलवाडे, सहशिक्षक राजकुमार पाटील, संतोष माळवदे यांची उपस्थिती हाेती. अहमदपूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ शहर-सुंदर शहरासाठी, जनजागृतीसाठी विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी कलाशिक्षक महादेव खळुरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.