शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

शिक्षणासाठी परदेशात जाणे हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. नामवंत विद्यापीठात शिक्षण घेणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

शिक्षणासाठी परदेशात जाणे हे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. नामवंत विद्यापीठात शिक्षण घेणे हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. लातूर शहरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात असतात. शहरातील विद्यार्थ्यांचे लस न घेतल्यामुळे नुकसान होऊ नये, या भूमिकेतून महानगरपालिकेने लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार निर्णय घेतला आहे. अमेरिका, युरोप व अन्य काही देशात कोविशिल्ड ही लस मान्यताप्राप्त आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना तीच लस दिली जाणार आहे. पदवीपूर्व,पदव्युत्तर तसेच पीएचडी करण्यासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना विदेशात जावयाचे आहे अशांनी आधार कार्ड, पासपोर्ट, विदेशातील संबंधित विद्यापीठाकडून आलेले अनकंडिशनल ऑफर लेटर,

व्हिसा प्रमाणपत्र अथवा त्यासाठी अर्ज केलेली कागदपत्रे लसीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सदर कागदपत्रे सादर करून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केले आहे.