खरोसा येथील उपसरपंच पदासाठी जोरदार रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST2021-02-07T04:18:22+5:302021-02-07T04:18:22+5:30
खरोसा येथील सरपंच व उपसरपंच पदाची येत्या १२ रोजी निवड होणार आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत युवा ग्रामविकास पॅनेलचे १३ ...

खरोसा येथील उपसरपंच पदासाठी जोरदार रस्सीखेच
खरोसा येथील सरपंच व उपसरपंच पदाची येत्या १२ रोजी निवड होणार आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत युवा ग्रामविकास पॅनेलचे १३ पैकी ११ सदस्य विजयी झाले आहेत. त्यात ६ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. सरपंचपद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने संयोगिता साळुंके व पुष्पा डोके यांच्यापैकी एका महिलेची निवड होणार आहे. सरपंचपदी महिला विराजमान होणार असल्याने उपसरपंचपदी वर्णी लागावी म्हणून इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण गावचे लक्ष लागून राहिले आहे.
येथील युवा ग्रामविकास पॅनेलमधून ६ पुरुष विजयी झाले आहेत. त्यापैकी चौघांनी उपसरपंचपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गावात चर्चेस उधाण आले आहे.