देवणी तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:23+5:302021-04-11T04:19:23+5:30
तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद होती. शनिवारी दिवसभर शहरातील बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. दुपारनंतर ...

देवणी तालुक्यात कडकडीत बंद
तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद होती. शनिवारी दिवसभर शहरातील बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. दुपारनंतर वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलकासा पाऊस झाला. देवणी शहरासह वलांडी, जवळगा, धनेगाव, दवणहिप्परगा येथेही लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला. शनिवारी तालुका प्रशासन रस्त्यावर उतरले होते. शहरासह तालुक्यातील मोठ्या गावातील चौकाचौकात नाकाबंदी करण्यात येत होती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जात होती. या मोहिमेत तहसीलदार सुरेश घोळवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज शिनगारे, रणजित काथवटे, सहायक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, नायब तहसीलदार तरंगे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव, तलाठी आर.व्ही. कांबळे, राजे, सुग्रीव बिरादार, नगर पंचायतचे सुमित देबडवार, नाजिम मोमीन, बाळू बोंद्रे, यादव लोकरे, अमोल शिंदे, अमोल बाजुळगे, पोहेकॉ विनायक कांबळे, डोंगरे, शेख, पंचायत समितीचे अमोल गायकवाड, विनोद खरात, ईश्वर मुर्के, शरद जाधव, शरद धनेगावे, केदासे, कट्टेवार यांचे पथक होते.