शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये कडकडीत बंद; लांबपल्ल्याच्या बसेस आगारातच

By संदीप शिंदे | Updated: September 2, 2023 14:34 IST

जालना जिल्ह्यातील घटनेचे पडसाद : बसअभावी प्रवासी ताटकळले

लातूर : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली. सोबतच एसटी महामंडळाच्या वतीने लांबपल्ल्याचा गाड्या शनिवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

लातूर शहरात सकाळी १० वाजता मराठा क्रांती माेर्चासह समाजबांधवांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैठक झाली. यामध्ये लातूर बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे गंजगोलाई, दयानंदगेट परिसर, गांधी चौकासह विविध भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत आवाहनाला प्रतिसाद दिला. शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होती. दरम्यान, महामंडळाने शनिवारी लांब पल्ल्याच्या विविध मार्गावरील बसेस बंद ठेवल्या. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. तसेच विविध शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी दिली.

मराठा समाजबांधवांची दुचाकी रॅली...लातूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बैठक झाल्यावर लातूर बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. तसेच रेणापूर येो कडकडीत बंद पाळण्यात आला. तर निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे आडत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षणstate transportएसटी