शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 19:57 IST

पोलीस अधीक्षक आर. राजा : सोशल पोलिसिंगवरही भर

विजय मुंडेउस्मानाबाद : समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. अवैध धंदे चालविणाºयांसह समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाºया गावगुंडांवर यापुढे धडक कारवाई केली जाईल. शिवाय, ठाणेस्तरावर सर्वसामान्यांशी संवाद वाढवून शांतता प्रस्थापित करणार असल्याचे उस्मानाबादचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आऱ राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

आर. राजा म्हणाले, गडचिरोली येथील कामकाज आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कामकाजात खूप मोठा फरक आहे़ उस्मानाबादचा पदभार हाती घेतल्यानंतर पोलिसिंगच्या दृष्टीने माहिती घेतली आहे़ यापुढील काळात वेळोवेळी ठाणेस्तरावर बैठका घेऊन सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहोत. 21 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्यात केवळ 1800 पोलीस कर्मचारी आहेत़ त्यामुळे सर्वसामान्यांनीही सत्याच्या मागे खंबिरपणे उभा राहून पोलिसांच्या प्रत्येक कामात आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे़ विविध कारणांवरून सतत भांडणे करून धार्मिक तेढ निर्माण करणाºयांवर आमचे विशेष लक्ष राहणार आहे़ यापूर्वीच्या घटनांमध्ये वेळोवेळी सहभाग असलेल्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यावर आपला अधिक भर राहणार आहे. पोलीस ठाणे, वसाहती दुरूस्तीसाठीही आपण पाठपुरावा करणार आहोत. शहरी भागातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तुळजापूर शहरातील ट्रॉफिकचा प्रश्न सोडविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत़ विशेषत: यात्रा कालावधीत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे़ सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही आर. राजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी मोहीमठाणेस्तरावर दाखल प्रलंबीत गुन्ह्यांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी वेळोवेळी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. गुन्ह्यांच्या तपासासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.शाळा, महाविद्यालयांना भेटीमहिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पथक कार्यरत असून, शाळेच्या वेळांमध्ये पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे़ लवकरच शाळा-महाविद्यालयात भेटी देऊन, विद्यार्थ्यांशी चर्चा केली जाणार आहे़ मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या जाणार आहेत.सोशल मीडियावर विशेष लक्षसोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, फोटो टाकून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवले आहे़ सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनीही कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही पोलीस अधीक्षक आ. राजा यांनी केले आहे. 

टॅग्स :laturलातूरLatur S Pपोलीस अधीक्षक, लातूरPoliceपोलिसOsmanabadउस्मानाबाद