पद्मा नगरातील पथदिवे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST2021-03-25T04:19:26+5:302021-03-25T04:19:26+5:30
अस्ताव्यस्थ पार्किंगमुळे क्रीडा संकुलात अडचण लातूर : जिल्हा क्रीडा संकुलात अस्ताव्यस्थ पार्किंगमुळे खेळाडू व नागरिकांना प्रवेश करतेवेळी अडचण निर्माण ...

पद्मा नगरातील पथदिवे बंद
अस्ताव्यस्थ पार्किंगमुळे क्रीडा संकुलात अडचण
लातूर : जिल्हा क्रीडा संकुलात अस्ताव्यस्थ पार्किंगमुळे खेळाडू व नागरिकांना प्रवेश करतेवेळी अडचण निर्माण होत आहे. मुख्य गेटच्या समोरच पार्किंग केल्यामुळे खेळाडू व नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यासह दोन्ही बाजूंवरील रस्त्यावर दुतर्फा पार्किंग होत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. पार्किंगवर तोडगा काढून शिस्तीने पार्किंग करावी, अशी मागणी खेळाडू, नागरिकांतून होत आहे.
शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांचा सत्कार
लातूर : लातूर जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल तृप्ती अंधारे यांचा जिजामाता विद्यालयाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या सलिमा सय्यद, जि. प.चे अधीक्षक ढाकणे, भाग्यश्री गुडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.