शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात वादळी वारे; पावसाने व्यावसायिकांची उडवली धांदल, आंब्याला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 06:36 IST

अवकाळी पावसामुळे काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

लातूर : वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् अचानक आलेल्या पावसामुळे लातूर शहरातील व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली. सायंकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. त्यातच वीजही गुल झाली. दिवसभर वातावरणात उकाडा होता, सायंकाळी पाच वाजेपासून ढगाळ वातावरण झाले होते. अवकाळी पावसामुळे काहीअंशी दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागात आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

गंजगोलाई भागात नेहमीप्रमाणे बाजारात ग्राहकांची वर्दळ होती. रमजान महिना सुरू असल्याने या भागात अनेकांनी दुकाने थाटली आहे. सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत या भागात खरेदीसाठी गर्दी असते. त्यामुळे अनेकजण विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात. रविवारी सायंकाळी ग्राहकांची गर्दी सुरू असताना अचानक जोरदार वारे अन् पावसाने सुरुवात केल्याने धावपळ उडाली. अनेक फळविक्रेते, भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याचा मोठा फटका असल्याचे फळविक्रेते शादुल शेख यांनी सांगितले. या अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा पाऊस जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाला. 

भाजीपाला भिजला, पालही उडाले बार्शी रोडवर दयानंद गेट ते संविधान चौक समांतर रस्त्यावर भाजीपाला बाजारातही व्यावसायिकांची धावपळ झाली. अनेकांनी नजीकच्या दुकानांत पावसापासून बचावासाठी आश्रय घेतला. शेतकऱ्यांचा भाजीपाला मात्र उघडा पडला.  पावसाने उघडीप दिल्यावर काही शेतकऱ्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार भाजीपाल्यांची विक्री केली. उन्हापासून बचावासाठी लावण्यात आलेल्या पालांचे प्लास्टिक वादळी वाऱ्यात उडून गेले. अवकाळी पावसाने नुकसान झाल्याचे भाजीपाला विक्रेते गफूर शेख, सुनंदा माने यांनी सांगितले. 

रस्त्यांवर पाणीच पाणी वादळी वारे थांबल्यावर सायंकाळी ६.३५ ते ७.२० वाजण्याच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू होता. लातूर शहरातील प्रमुख मार्गांवर अनेक ठिकाणी रस्त्याने पाणी वाहत होते. पाच नंबर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजीव गांधी चौक, जुना रेणापूर नाका, बार्शी रोडवरील भाजीपाला, फळबाजार, नांदेड रोडवरील स्वामी विवेकानंद चौकातील व्यावसायिकांना या पावसाचा फटका बसला आहे.  रविवार सुटीचा दिवस असल्याने दुपारनंतर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते, त्यामुळे अनेकजण मालाची खरेदी करून दुकानात सजावट करून बसतात. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसाने धावपळ झाली.

आंबा, टरबूज, ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसानरबी हंगामातील ज्वारीची काढणी तसेच राशीचे काम सध्या केले जात आहे. वातावरण उष्णतेचे असल्याने शेतकऱ्यांनी उघड्यावर ठेवलेली ज्वारी कणसं पावसात भिजली आहेत. तर ज्यांची काढणी शिल्लक आहे, अशा शेतकऱ्यांची उभी ज्वारी वादळी वाऱ्यात आडवी झाली. 

पावसामुळे ज्वारी काळी पडणार, दर कमी मिळाल्याने आर्थिक फटका बसण्याची भीती शेतकरी महादेव भिसे यांनी सांगितले. वादळी वाऱ्यात आंब्याच्या कैऱ्या झडून गेल्या आहेत.

टॅग्स :Rainपाऊस