महात्मा फुले समता परिषदेचा तिवटग्याळ पाटी येथे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:08+5:302020-12-05T04:32:08+5:30
उदगीर : तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे शुक्रवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दोन तास ...

महात्मा फुले समता परिषदेचा तिवटग्याळ पाटी येथे रास्ता रोको
उदगीर : तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे शुक्रवारी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करावे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला इतर आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्यांसाठी नळेगाव- लातूर रोडवरील तिवटग्याळ पाटी येथे सकाळी ११ वा.पासून दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मकरंद सावे, जिल्हाध्यक्ष बालाजी फुले, खरेदी- विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, बाबुराव अंबेगावे, अजहर शेख, ज्ञानोबा गोडभरले, कमलाकर फुले, शिवहार रोडगे, मच्छिंद्र कांबळे, अभिमान पताळे, गणेश फुले, सुनील फुले, बाबुराव फुले, हरिभाऊ फुले, बाळू हुरुसनाळे, गणपत मतकरे, गोपाळ शिंदे, कपिल डाके, दत्ता खटके, प्रशांत पाटील, ईश्वर खटके, राजकुमार कांबळे, राजकुमार नादरगे, प्रताप पोलकर, बजरंग पोलकर, बालाजी पोलकर, शिवाजी पोलकर, गुरुनाथ भद्रशेट्टी आदी उपस्थित होते.
***