चापोलीत मनसेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:26+5:302021-06-06T04:15:26+5:30
आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी मनसेचे तालुका सरचिटणीस राहुल आरडवाड, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पस्तापुरे, नंदकुमार सुडे हे १ जूनपासून ...

चापोलीत मनसेचा रास्ता रोको
आनंदवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी मनसेचे तालुका सरचिटणीस राहुल आरडवाड, तालुका उपाध्यक्ष हनुमंत पस्तापुरे, नंदकुमार सुडे हे १ जूनपासून ग्रामपंचायतीसमोर उपोषण करीत आहेत. पाचवा दिवस उजाडला तरी संबंधितांकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी चापोली येथे शनिवारी दुपारी लातूर- नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी संभाजी बडगिरे, इरफान अत्तार, शंकर पाटील, नरसिंग शेवाळे, संदीप कलवले, बस्वराज होनराव, सुरेश शेवाळे, विष्णू बोंबडे, कृष्णा बोंबडे, बालाजी आवस्कर, लहू माने, शंकर माने, संभाजी माने, शरद सोनकांबळे, ब्रह्मा पंढरपुरे, दत्ता शिंदे, ऋषिकेश पिटले, इस्माईल सय्यद, जुबेर आत्तार, नारायण आवस्कर, सुशांत शेळके, गजानन शेळके, अक्षय शेळके, मदन आरदवाड, गुणवंत काळे, परमेश्वर भंडारे, मारोती आवस्कर, शिवाजी बडगिरे आदी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे प्रभारी तहसीलदार बालाजी चितळे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, पं.स. उपसभापती सज्जन लोनाळे यांनी आनंदवाडीत जाऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत उपोषण मागे घेण्यास सांगितले.