संजय गांधी निराधार योजनांसह अनेक सरकारी योजना गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी आहेत. तहसील कार्यालय येथे या लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते, परंतु प्रत्यक्षात या योजनांचे अर्ज मंजुरीसाठी पैसे लागतात, म्हणून काही दलाल गरजू लोकांची फसवणूक करत आहेत. अर्ज मंजुरीसाठी ३ ते ५ हजार रुपये घेत आहे, असे या निवेदनात लोहारे यांनी म्हटले केले आहे. दलालांना तहसील कार्यालयात प्रवेश देऊ नये, तसेच संजय गांधी यासह अन्य योजनांचे अर्ज मंजूर करताना सभागृहात व्यापक बैठक घेऊन मंजूर केल्यास गरजू लोकांना फायदा होईल, अन्यथा तहसीलसमोर बोंब ठोक आंदोलन करणार असल्याचा इशाराही लोहारे यांनी दिला आहे.
तहसील कार्यालयात तक्रार करावी...
निराधारांच्या अनुदान मंजुरीसाठी लाभार्थ्यांनी दलालाकडे जाऊ नये. कोणासही पैसे देऊ नये. निराधारांना कोणती कागदपत्रे मिळत नसतील व पैशाची मागणी करत असेल, तर तहसील कार्यालयात तक्रार द्यावी. संबंधितावर कारवाई केली जाईल.
- डॉ.शिवानंद बिडवे, तहसीलदार.