निलंगा तालुक्यातील हसुरी बु. येथे ग्रामदैवत महादेव मंदिरास तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र निधी अंतर्गत सभागृहाचे भूमिपूजन अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अरविंद पाटील म्हणाले, मागील काळात केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून ग्रामीण भागातील विकास पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला आहे. विविध योजनेच्या माध्यमातून गावस्तरावरील विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आला आहे. आगामी काळात औसा व निलंगा मतदारसंघातील जनतेला विकासाची कमतरता भासणार नाही. तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या निकषामध्ये गावकऱ्यांनी प्रयत्न करून तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, सभापती राधा बिराजदार, जि.प. सदस्या अरुणा बरमदे, चेअरमन दगडू सोळुंके, ज्ञानेश्वर बरमदे, उपसभापती अंजली पाटील, तलाठी अनिल पूरी, डॉ. बालाजी बरमदे, माणिकराव बरमदे, दीपक स्वामी, संतोष बरमदे, गुंडेराव बरमदे, जीवन नेलवाडे, अर्जुन नेलवाडे, सरपंच अश्विनी बिराजदार, उपसरपंच सचिन अरीकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.