शहरात उपासमार; श्रमिकांचा लोंढा गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:26+5:302021-04-10T04:19:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गावगाड्यात काम नाही म्हणून भाकरीच्या शोधात निघालेल्या हजारो मजुरांचे लोंढे आता पुन्हा ‘गड्या ...

शहरात उपासमार; श्रमिकांचा लोंढा गावाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गावगाड्यात काम नाही म्हणून भाकरीच्या शोधात निघालेल्या हजारो मजुरांचे लोंढे आता पुन्हा ‘गड्या आपला गाव बरा म्हणून’ गावच्या दिशेने निघाले आहेत. मध्यंतरी निर्बंध शिथिल झाल्याने, रुग्णसंख्या घटल्याने शहरातील व्यापार पूर्वपदावर आले होते.
कारखानदारी काही प्रमाणात सुरू झाली होती. रोजगार मिळविण्यासाठी मोठ्या शहरांत मजुरांचे स्थलांतर झाले होते. आता शहरातील रोजगार अडचणीत आला आहे. परिणामी, पुन्हा मजुरांचे लोंढे गावच्या दिशेने निघाले आहेत. लातूर जिल्ह्यातील लाखो मजूर मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद शहरात स्थलांतरित झाले. कोरोनाने त्यांच्या रोजगारावरच आता टाच आणली आहे.
गावात रोजगार मिळेना
गावात रोजगार मिळत नसल्याने आम्ही मुंबईत दाखल झालो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रोजगार धोक्यात आले. आता शहरात जगणे कठीण झाले आहे.
- अमोल सोमवंशी
गड्या आपला गाव बरा
शहरातील रोजगार, कारखानदारीवर गत वर्षभरापासून संक्रांत आली आहे. यातून मजुरांचे हाल होत आहे. यासाठी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी गावच आपला आधार आहे.
- साहेबराव निकाळजे
रोजगाराअभावी जगण्याचे प्रश्न बनले गंभीर
गेल्या अनेक दिवसांपासून कामाच्या शोधात हैदराबाद येथे स्थलांतर केले. सध्या उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे रोजगार मिळणे कठीण झाले आहे. शेवटी जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. - बालाजी जाधव
मिळेल त्या वाहनाने मजूर परतले गावाकडे
लाॅकडाऊनपूर्वीचा अनुभव आणि त्यातून झालेले हाल मजुरांच्या पदरी आहे. आता पुन्हा ते हाल होऊ नयेत, यासाठी अनेक मजूर शहरातून गावाकडे स्थलांतर करीत आहेत. परिणामी, लातूरच्या बसस्थानकात मजुरांची गर्दी दिसून येत आहे. मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतण्याची लगबग सुरू आहे.
पुण्या-मुंबईत, कोकण परिसरात रोजगारासाठी गेलेल्या अनेक मजुरांनी शहरात उपासमार होऊ नये, यासाठी गावचा रस्ता धरला आहे. गावाकडे मिळेल त्या रोजगारावर गुजराण करण्याची तयारी मजुरांनी ठेवली आहे. आता शहरातला रोजगार नको, अशीच परिस्थिती मजुरांत आहे. मिळेल त्या वाहनाने मजूर परतले गावाकडे
लाॅकडाऊनपूर्वीचा अनुभव आणि त्यातून झालेले हाल मजुरांच्या पदरी आहे. आता पुन्हा ते हाल होऊ नयेत, यासाठी अनेक मजूर शहरातून गावाकडे स्थलांतर करीत आहेत. परिणामी, लातूरच्या बसस्थानकात मजुरांची गर्दी दिसून येत आहे.