वलांडी येथे विकेल ते पिकेल अंतर्गत सेंद्रिय फळभाज्या विक्रीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST2021-09-16T04:25:42+5:302021-09-16T04:25:42+5:30

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे आर.एस. पाटील यांच्या नियोजनाअंतर्गत शेतकऱ्यांनी कष्टातून उत्पादित केलेला फळपीक भाजीपाला, सेंद्रिय उत्पादनांचा ...

Start selling organic fruits and vegetables at Valandi | वलांडी येथे विकेल ते पिकेल अंतर्गत सेंद्रिय फळभाज्या विक्रीस प्रारंभ

वलांडी येथे विकेल ते पिकेल अंतर्गत सेंद्रिय फळभाज्या विक्रीस प्रारंभ

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे आर.एस. पाटील यांच्या नियोजनाअंतर्गत शेतकऱ्यांनी कष्टातून उत्पादित केलेला फळपीक भाजीपाला, सेंद्रिय उत्पादनांचा भाव ठरवून तालुक्याच्या ठिकाणी त्यांना विक्रीस्थळे उपलब्ध करून देण्यात येत असून, या माध्यमातून अधिकचा नफा हा थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे. प्रभारी तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांच्या नियोजनानुसार तालुक्यातील विविध ठिकाणे निवड करण्यात आलेले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांची फळपीक आणि भाजीपाला विक्री चालू झालेली आहे. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रशांत पाटील, सरपंच हनुमंत बिरादार, बी.एस. पाटील, कृषी पर्यवेक्षक बी.एम. जाधव, कृषी सहाय्यक शरद धनेगावे, राहुल जाधव, माया श्रीनामे, संग्राम भोसले, ओमकार मस्कले, भोसले गुरुजी, बाबुराव भोसले आदींसह शेतकरी उपस्थित होते.

३२ ठिकाणांची करण्यात आली निवड...

तालुक्यात ३२ ठिकाणे निवड करण्यात आली असून, जवळपास १८ ठिकाणाच्या माध्यमातून स्वतः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या १४ लाख रुपयांचा ८० मेट्रिक टन शेतमाल हा स्वतः शेतकऱ्यांनी शेतकरी ते थेट ग्राहक या साखळी अंतर्गत विकलेला आहे.

Web Title: Start selling organic fruits and vegetables at Valandi