यावेळी संघर्ष समितीचे सुधाकरराव लोहारे, बालाजी उमाटे, शिवलिंग गादगे, अजित घंटेवाड, अजय धनेश्वर, सागर होळदांडगे, आत्माराम डाके, राजकुमार डुमणे, सुरेश फरकांडे, विश्वनाथ कांबळे, अर्जुन भोयटे यांची उपस्थिती होते. कोरोनाचा आलेख उतरला आहे. बाजारपेठा तसेच अन्य व्यवसाय सुरू झाले आहेत. चाकूर तालुक्यातील अनेक गावे आता कोरोना मुक्त झाली आहेत. अशा गावातील शाळा, महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे. तसेच गावात कोरोना वाढणार नाही त्यासाठी प्रत्येक गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय राज्य पातळीवरुन घेतला जाऊ शकतो परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सांगितले.