रस्त्यावर साचले पाणी, स्थानिक नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST2021-03-31T04:20:15+5:302021-03-31T04:20:15+5:30
लातूर बिदर महामार्गावर जिजाऊ चौक येथे हा रस्ता बायपास म्हणून जोडलेला आहे. त्याचबराेबर सदर रस्त्यावर हजरत अली दर्गा, दवाखाने, ...

रस्त्यावर साचले पाणी, स्थानिक नागरिक त्रस्त
लातूर बिदर महामार्गावर जिजाऊ चौक येथे हा रस्ता बायपास म्हणून जोडलेला आहे. त्याचबराेबर सदर रस्त्यावर हजरत अली दर्गा, दवाखाने, शाळा, मंदिर असल्याने मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्यावर गत आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. पाणी साचल्याने शेजारच्या घरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. निलंगा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्याने तातडीने लक्ष देत पाईपलाईनचे काम पूर्ण करावे, साचलेल्या गटारी स्वच्छ कराव्यात, सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सोमवारी साचलेल्या पाण्यातून चोरटी वाहतूक करणारे लाकडाचे ट्रॅक्टर पाण्यात अडकून उलटले. याप्रकरणी तालुका वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत ते ट्रॅक्टरचालक आणि चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.