देवणी ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:22 IST2021-05-25T04:22:26+5:302021-05-25T04:22:26+5:30
२१ मे रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे रुग्णांच्या काही नमुन्यांची तपासणी करीत होते. ...

देवणी ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची हाणामारी
२१ मे रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे रुग्णांच्या काही नमुन्यांची तपासणी करीत होते. तेव्हा तिथे अन्य एक कर्मचारी मद्य प्राशन करून बाहेरील दोघा युवकांना सोबत घेऊन आला. प्रयोगशाळा तंत्रज्ञासोबत वाद घालून भांडण करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करून मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. सदरील तंत्रज्ञाने ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे तसेच आपणाला संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, हा प्रकार पाहून कर्तव्यावर असलेले कर्मचारी अवाक् झाले तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्णही हादरून गेले. या प्रकरणावर वरिष्ठ काय कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.