शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लातूर विभागाला एसटी संपाचा फटका; ७४ दिवसात ४० काेटींवर पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 21:42 IST

अर्थचक्र थांबले : ४५० बसेस जाग्यावरच असल्याने प्रवाशांची होतेय हेळसांड

- राजकुमार जाेंधळे लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गत २७ ऑक्टाेबर २०२१ पासून राज्यासह लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगरातील एसटी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाचा रविवारी ७४ वा दिवस हाेता. या काळात लातूर विभागाला माेठा फटका बसला असून, तब्बल ४० काेटींचे आर्थिक उत्पन्न बुडाले आहे. पाच आगारातील ४९० बसेसपैकी ४५० बसेस जाग्यावरच धूळखात पडून आहेत. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर विभागातील पाच आगारात एकूण कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ६८९ आहे. यातील ६८६ कामगार प्रत्यक्ष कामावर आणि साप्ताहिक सुट्टीवर आहेत. अधिकृत रजेवरील कर्मचाऱ्यांची संख्या १२० च्या घरात आहे. तर प्रत्यक्ष आंदाेलनामध्ये १ हजार ८८३ कर्मचारी, कामगार सहभागी आहेत. टप्प्या-टप्प्याने काही कामगार, कर्मचारी कामावर परतू लागले आहेत. अशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर ११ डिसेंबरला लातूर विभागात पहिली लालपरी धावली. आता या लालपरींचा आकडा ४० वर पाेहचला आहे. एसटी महामंडळ प्रशासनाकडून संपकरी, आंदाेलक चालक, वाहकांचे समुपदेशन करुन कामावर परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही कामगारांकडून प्रतिसाद दिला जात आहे. मात्र, बहुतांश कामगार आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसले आहेत.

दरराेज ६० लाखांचे उत्पन्न...

लातूर विभागातील पाच आगरातील एकूण दैनंदिन उत्पन्नाचा आकडा ५५ ते ६० लाखांच्या घरात हाेता. मात्र, ताे काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून ५ ते १० लाखांच्या घरातच अडकला आहे. आता तर गत ७४ दिवसांपासून महामंडळाची प्रवासी वाहतूकच बंद असल्याने आर्थचक्रही जाग्यावरच थांबले आहे. परिणामी, संपाच्या काळात लातूर विभागाला तब्बल ४० काेटींचा आर्थिक फटका बसला आहे.

दुरुसती, देखभालीचा खर्चही आला अंगलट...

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात एकूण ४५० लालपरी जाग्यावरच थांबून आहेत. सध्या या बसेसमध्ये तांत्रिक बिघाड हाेत आहेत. दुरुस्ती आणि देखभालीचा खर्चही आता महामंडळाला पदरमाेड करुन करावा लागत आहे. काेराेनाने एसटी महामंडळ डबघाईला आले आहे. त्यातच संपाचा माेठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी, महामंडळ सलाईनवर आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपlaturलातूर