एस.टी. ची चाके थांबली; १४ लाखांवरून ४ लाखांवर उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:19 IST2021-04-07T04:19:59+5:302021-04-07T04:19:59+5:30
आगारातील एकूण बस १०४ एकूण कर्मचारी ६५४ चालक २४४ वाहक २७५ रोजच्या फेऱ्या १७९ रोजचे नुकसान १० लाखांचे या ...

एस.टी. ची चाके थांबली; १४ लाखांवरून ४ लाखांवर उत्पन्न
आगारातील एकूण बस १०४
एकूण कर्मचारी ६५४
चालक २४४
वाहक २७५
रोजच्या फेऱ्या १७९
रोजचे नुकसान १० लाखांचे
या मार्गावरील काही फेऱ्या बंद
लातूर-उदगीर मार्गावर दिवसाला ५० फेऱ्या होत्या. सध्या दहा फेऱ्या सुरू असून, कळंब-लातूर मार्गावर २० फेऱ्या सुरू होत्या. यातील दहा फेऱ्या बंद झाल्या आहेत. उस्मानाबाद-लातूर मार्गावर ६० फेऱ्या होत्या. २० फेऱ्या बंद झाल्या आहेत. अंबाजोगाई मार्गावर २० फेऱ्या होत्या. फक्त चार फेऱ्या सुरू आहेत. लातूर आगाराला उत्पन्न देणाऱ्या निम्म्या फेऱ्या प्रवासी नसल्यामुळे बंद कराव्या लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून अंबाजोगाई मार्गावरील फेऱ्या बंद राहिल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
उत्पन्नात मोठी घट; वार्षिक दोन कोटींचे नुकसान
मार्च २०१९ मध्ये कोरोना नव्हता. त्यावर्षी ४ कोटी २५ लाख लातूर आगाराला उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर २०२० मधील मार्च महिन्यापर्यंत २ कोटी ६३ लाख उत्पन्न मिळाले. २०२० मध्ये जानेवारी महिन्यापासून कोरोना आल्यामुळे उत्पन्नात घट झाली. तर मार्च २०२१ पर्यंत कसाबसा लातूर आगाराला २ कोटी ७६ लाखांचा व्यवसाय झाला. साधारणपणे दोन कोटींचे नुकसान लातूर आगाराला झाले.
लातूर आगाराच्या ५५ फेऱ्या प्रवासी नसल्यामुळे बंद केल्या आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. डिझेल आणि दुरुस्तीचा खर्च निघेल की नाही, अशी स्थिती आहे. तरीही या संकटावर मात प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही सुरूच ठेवला आहे.
- जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक, लातूर