कुमठा (बु.) येथे एसटीच्या बस वाहकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:23+5:302021-08-22T04:23:23+5:30
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर आगारातील वाहक गोरख माणिकराव भाले (४५ रा. जानापूर-शिराेळ ता. उदगीर) हे शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१ रोजी ...

कुमठा (बु.) येथे एसटीच्या बस वाहकाला मारहाण
पाेलिसांनी सांगितले, अहमदपूर आगारातील वाहक गोरख माणिकराव भाले (४५ रा. जानापूर-शिराेळ ता. उदगीर) हे शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१ रोजी अहमदपूर आगाराची शिरुर ताजबंद ते शिवणखेड ही बस घेऊन निघाले हाेते. दरम्यान, शिरुर ताजबंद येथून शिवणखेडच्या दिशेने २७ प्रवासी घेऊन बस मार्गस्थ झाली. कुमठा येथे बस आल्यानंतर आंबेडकर चाैकात प्रवाशांना उतरण्याची सूचना वाहकाने केली. आंबेडकर चाैकात एकच प्रवासी उतरला. त्यानंतर बस कुमठा गावातील कमानीजवळ आली. येथे काही प्रवासी उतरले. त्यानंतर चालक मसनाजी तुकाराम हारगेवाड (४७) याने बस वळवून घेतली. एक प्रवासी वयाेवृद्ध असल्याने मला आंबेडकर चाैकात उतरायचे हाेते. पांडुरंग माणिक तिगोटे (रा. कुमठा बु. ता. अहमदपूर) याने मला चौकात उतरायचे होते, तू गाडी इथे का थांबविली नाही, बस परत चौकात घेऊन चल, मला तिथे सोड म्हणाले असता, वाहक भाले यांनी ही बस शिवणखेडला जाणार आहे. तुम्ही येथेच उतरा असे सांगितले. यावेळी वाहक साेबत हुज्जत घालत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ड्रेसचा खिसा फाडून तिकीट विक्रीचे १ हजार ७९५ रुपये आणि मोबाईल असा एकूण ११ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पांडुरंग तिगोटे यांच्याविराेधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.