सृष्टी जगतापचा लातुरात गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:58+5:302021-02-05T06:24:58+5:30
महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याची मागणी लातूर : शहरात महाराणा प्रतापसिंह यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी महानगरपालिकेचे आयुक्त ...

सृष्टी जगतापचा लातुरात गाैरव
महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याची मागणी
लातूर : शहरात महाराणा प्रतापसिंह यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी वीर-शिराेमणी महाराणा प्रतापसिंहजी पूर्णाकृती स्मारक समितीचे अध्यक्ष शिवसिंह सिसाेदिया, उपाध्यक्ष अमरसिंह राजपूत, सचिव नगरसेवक रमेश बिसेन, धिरजसिंह तिवारी, काेषाध्यक्ष पृथ्वीसिंह बायस, धाेंडूसिंह ठाकूर, कपील तिवारी, संताेषसिंह ठाकूर, जयंती समितीचे चरणसिंह तिवारी, संताेष तिवारी, बजरंगसिंह ठाकूर, सागरसिंह परदेशी, आदित्यसिंह राजपूत, अमरसिंह तिवारी, सूरजसिंह परदेशी, महेशसिंह किल्लेदार, लक्ष्मणसिंह ठाकूर, अक्षय तिवारी यांच्यासह राजपूत समाजबांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
काॅँग्रेस भवनमध्ये महात्मा गांधी यांना अभिवादन
लातूर : महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काॅँग्रेस भवन येथे शनिवारी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा काॅँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव भाेसले, सचिन दाताळ, हकीम शेख, संजय जगताप, प्रवीण कांबळे, सिकंदर पटेल, विलास साखर कारखान्याचे संचालक गाेविंद डुरे, ॲड. प्रदीप गंगणे, ॲड. देविदास बाेरुळे यांच्यासह काॅँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.