येथील महात्मा गांधी महाविद्यालय व लातूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात बास्केटबॉल खेळाडूंसाठी पोषक आहाराचे महत्त्व या विषयावर आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत ते बोलत होते. उद्घाटन विचार विकास मंडळाचे सचिव ॲड. पी.डी. कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गीतांजली भिडे, विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. प्रदीप देशमुख, प्राचार्य मेजर डॉ. एस.के. खिल्लारे यांची उपस्थिती होती.
यावेळी ॲड. कदम, डाॅ. गीतांजली भिडे, डॉ. प्रदीप देशमुख यांनी मनोगत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. मनोज रेड्डी, सूत्रसंचालन प्रा. मुळे यांनी केले. आभार बास्केटबॉल प्रशिक्षक वैभव चेंडके यांनी मानले. सदरील कार्यशाळेत ४०० जणांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला.
आरोग्य सदृढ होते...
ॲड. बेंडकुळे म्हणाले, खेळामुळे माणसाच्या शरीराबरोबरच त्याच्या मनाचेही आरोग्य चांगले राहते. त्यामुळे मुलांनी व त्यांच्या पालकांनीही खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे.